संत निळोबाराय अभंग

यशोदा म्हणे हे राजभगिनी – संत निळोबाराय अभंग ३७

यशोदा म्हणे हे राजभगिनी – संत निळोबाराय अभंग ३७


यशोदा म्हणे हे राजभगिनी ।
कां पां आलिसे थांबोनी ।
जाईल बाळका झडपोनी ।
कैसे करुं हे राक्षसी ॥१॥
बहुत उपचारेंसी पूजिली ।
पूतना सन्मानें बैसविली ।
मग ते म्हणे ये यशोदे भली ।
पुत्रवंती झालिसी ॥२॥
आणि नाही सांगोनियां धाडिलें ।
ऐंसें निष्ठुरपण त्वां धरीलें ।
श्रवणीं ऐकतांचि धावोनियां आलें ।
आनंदले ह्रदयांत ॥३॥
आणिली विचित्र बाळलेणी ।
बाळंतविडाही तुजलागुनी ।
आणीगें तान्हुलें पाहों दे नयनी ।
ऐकोनी यशोदा मनी गजबजिली ॥४॥
म्हणें कैसे तरी करुं ईसी ।
राजभगिनी हे राक्षसी ।
दिठाविल माझिया सुकुमारासी ।
दिठीचि कठीण इयेचि ॥५॥
मग म्हणे आतांचि न्हाणिलें ।
बाळक पालखीं निजविले ।
हे ऐकतांचि नवल केलें ।
बाळक उठलें न राहेंचि ॥६॥
निळा म्हणे पूतना तेथें ।
रोषें बोलें यशोदेतें ।
काय गे नष्टपण हें तूंते ।
मिथ्याचि झकविशी मजलागी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यशोदा म्हणे हे राजभगिनी – संत निळोबाराय अभंग ३७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *