संत निळोबाराय अभंग

आतां तरी बालका आणी – संत निळोबाराय अभंग ३८

आतां तरी बालका आणी – संत निळोबाराय अभंग ३८


आतां तरी बालका आणी ।
आपल्या करें मी लेववीन लेणीं ।
यशोदा म्हणे मांडिली हाणी ।
निवांत पोरटें नसेची ॥१॥
मग जाऊनियां पालखाजवळी ।
म्हणे मृत्यु पाचारिंतो तूंते वनमाळी ।
उगाचि असतासि जरि ये कळीं ।
तरि वांचतासी काय करुं ॥२॥
ऐसें बोलोनियां आणिला ।
पूतने वोसंगा बैसविला ।
देखतांचि पूतने वोसंडला ।
उभंड प्रेमाचा न सावरे ॥३॥
सुंदरपणाचि झाली सीमा ।
उपदेशी मदना अंगी काळीमा ।
अवलोकूनियां पुरुषोत्तमा ।
तनुमनप्राणें निवालीं ॥४॥
म्हणे गे यशोदे साजणी ।
परम सुखाची हे लाधलीसी धणी ।
जतन करी पुत्रमणी ।
दुर्लभ भाग्येंचि पावलिसी ॥५॥
पूतना राक्षसी अति क्रूर ।
तेही देखोनियां कृष्णचंद्र ।
नयनी अश्रु आणूनियां वारंवार ।
श्रीमुखकमळ अवलोकी ॥६॥
निळा म्हणे अगाध बुध्दी ।
होउनी परतली प्रालब्द सिध्दी ।
म्हणे कार्य साधूनियां त्रिशुदी ।
जावें सत्वर राजभुवना ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां तरी बालका आणी – संत निळोबाराय अभंग ३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *