संत निळोबाराय अभंग

पूतना म्हणे भुकेला कान्हा – संत निळोबाराय अभंग ३९

पूतना म्हणे भुकेला कान्हा – संत निळोबाराय अभंग ३९


पूतना म्हणे भुकेला कान्हा ।
मग झडकरी उघडूनी लाविला स्तना ।
यशोदा म्हणे वो राजीवनयना ।
न सोसे दूध आणिकीचें ॥१॥
स्तनीं लागतांचि त्याचे वदन ।
विश तें अमृतसमान ।
शोषूनियां रक्त मांस-जीवन ।
पंचहि प्राण आकर्शिले ॥२॥
न सोसवे वेदना ते पूतने ।
म्हणे ओढीं ओढीं यशोदे तान्हें ।
ऐसें बाळ हें ही काय जाणें ।
वेंचले प्राण धांव धांव ॥३॥
तंव तो न सुटेचि सर्वथा ।
शिणल्या दासी परिचारिकाही ओडितां ।
नाना शब्दें आक्रंदतां ।
बिहालीं तत्वतां पळती लोकें ॥४॥
रक्त मांस अस्थींचे उदक ।
करुनियां चर्महि शोषियलें ।
देऊनियां सायुज्यसुखनीं स्थापियली ॥५॥
हें देखोनी दासी परिचारिका ।
भेणेंचि पळती अधो मुखा ।
जाऊनियां मथुरा लोंका ।
सांगती वार्ता रायसी ॥६॥
निळा म्हणे ऐकतां कानी ।
राजा चिंतावला बहुत मनीं ।
पुसे वर्तमान तया लागुनी ।
कैसे वर्तलें ते सांगा ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पूतना म्हणे भुकेला कान्हा – संत निळोबाराय अभंग ३९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *