संत निळोबाराय अभंग

तवं त्या करिती शंखस्फूरण – संत निळोबाराय अभंग ४०

तवं त्या करिती शंखस्फूरण – संत निळोबाराय अभंग ४०


तवं त्या करिती शंखस्फूरण ।
दीर्धवरें आक्रदन ।
तें ऐकांनियां नागरीक जन ।
हाहाभूत वोरसले ॥१॥
तयांते पुसता त्य म्हणती ।
दु:खर्णवी पडिलों हो भूपती ।
सांगता पुतनेची गती ।
मूच्छित पडती धरणीये ॥२॥
म्हणती जातांचिं गोकुळाभीतरी ।
प्रवेशतां नंद यशोदे घरी ।
उभयतां येऊनियां सामोरी ।
बहुत सन्माने गौरविले ॥३॥
विडे उपचार भोजन ।
पूतनाईतें तोषवून ।
मग आणिलें राजीवनयन ।
बाळ तान्हुले दाखविती ॥४॥
तंव तें घन:श्याम सांवळे ।
राजीवाक्ष राप रेखिलें ।
बाळलेणें विराजलें ।
नयनचि गोविलें देखतां ॥५॥
मग ते घेऊनियां जवळी ।
सतनीं लावितांचि तात्काळीं ।
सुरासुरा शोषुनियां वेल्हाळी ।
न सोडी जिवें प्राण जाता ॥६॥
निळा म्हणे त्या सोडविता ।
न सुटे पूतना आक्रंदतां ।
आम्हीही स्वशक्ती ओढितां ।
हरिलें तत्वतां प्राण तिचे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तवं त्या करिती शंखस्फूरण – संत निळोबाराय अभंग ४०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *