संत निळोबाराय अभंग

वोरसोनियां भक्तासाठीं – संत निळोबाराय अभंग – ३७७

वोरसोनियां भक्तासाठीं – संत निळोबाराय अभंग – ३७७


वोरसोनियां भक्तासाठीं ।
धांवे वैकुंठीहुनी उठाउठी ।
हात ठेऊनियां कटीं ।
उभा व्दारीं ठाकला ॥१॥
देखोनियां पुंडलिकासी ।
वास केला तयापाशीं ।
अवलोकूनियां निजभक्तांसी ।
परम विश्रांती पावला ॥२॥
जे जे येती दर्शनाशी ।
भुक्तिमुक्ति वांटी त्यांसी ।
गाती वानिती जे यासी ।
त्यां ने वैकुंठासी निज गजरें ॥३॥
नेघे त्यांची अतिशय सेवा ।
जिहीं आळविलें याचिया नांवा ।
धांवोनि त्यांचा करी कुडावा ।
आपुलिया गांवा ने त्यांसी ॥४॥
न म्हणेचि दिवसरात्री काहीं ।
सदा भक्तांचिये वाहीं ।
निळा म्हणे त्यांच्याची देहीं ।
प्रगट नव्हे निराळा ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वोरसोनियां भक्तासाठीं – संत निळोबाराय अभंग – ३७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *