संत निळोबाराय अभंग

जेणें पृथ्वीसीं धरीलें – संत निळोबाराय अभंग – ३७६

जेणें पृथ्वीसीं धरीलें – संत निळोबाराय अभंग – ३७६


जेणें पृथ्वीसीं धरीलें ।
सूर्या प्रकाश उटिलें ।
चंद्रबिंबीं अमृत ठेविलें ।
तेणें निववीत जगा तो ॥१॥
गगना पवाडू दिधला ।
मेरुस्तंभ उभारिला ।
गती पवनही उडविला ।
दाही दिशा फिरतसे ॥२॥
जेणें अग्नीसी दीपन ।
जीवनीं ठेविलें जीवन ।
आपोनिधी जळें पूर्ण ।
क्षीरें सागर भरियेला ॥३॥
नाना अन्नीं ठेविली तृप्ति ।
नाना परिमळ पुष्पयाती ।
नाना रसस्वाद फळाप्रति ।
एवढी युक्ती कोणाची ॥४॥
अपार चांदणे फुलोरा ।
जेणें शोभविलें अंबरा ।
पर्जन्याच्या करुनी धारा ।
जेणें पिकविलें धरणीतें ॥५॥
जेणें इ्रद्रादिकां देवां ।
पदीं स्थापुनी वांटिल्या सेवा ।
जेणें मर्दुनी दैत्य दानवां ।
केला सांभाळ भक्तांचा ॥६॥
जो या प्राणातें चाळिता ।
जीवा जिवणें ज्याचिया सत्ता ।
मनीं संकल्पाचिया चळथा ।
उठवी सत्ता हे कोणा ॥७॥
जो या श्रुतीतें पढविता ।
परमामृमातें जीववीता ।
सूर्या अंजन लेवविता ।
अवधी सत्ता हे ज्याची ॥८॥
चराचर व्यापूनियां उरला ।
उभा विटेवरीं ठाकला ।
निळा म्हणे तेणें केला ।
बुध्दी माझीये प्रकाश ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जेणें पृथ्वीसीं धरीलें – संत निळोबाराय अभंग – ३७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *