संत निळोबाराय अभंग

माझिये मनीं विश्रांती वाटे – संत निळोबाराय अभंग – ३७९

माझिये मनीं विश्रांती वाटे – संत निळोबाराय अभंग – ३७९

माझिये मनीं विश्रांती वाटे ।
देखतां गोमटे विटे चरण ॥१॥
तुळशीमाळा शोभल्या कंठी ।
प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥
कुंडलांचे दीप्ती झळाळ ।
शोभलें निढळ बुक्यानें ॥३॥
निळा म्हणे अंगींचे कांति ।
सूर्यादि लोपती शशिमंडळें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझिये मनीं विश्रांती वाटे – संत निळोबाराय अभंग – ३७९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *