संत निळोबाराय अभंग

निर्गुण निरामय संचले – संत निळोबाराय अभंग – ४५३

निर्गुण निरामय संचले – संत निळोबाराय अभंग – ४५३


निर्गुण निरामय संचले ।
गुणीतीत रुपा आलें ।
परात्पर तें सगुण झालें ।
उभें ठाकलें विटेवरी ॥१॥
कोटी कंदर्पाच्या दीप्ति ।
विराजली अंगकांति ।
गुणलावण्याची संपत्ती ।
विठ्ठल मूर्ति गोजिरी ॥२॥
पहातांचि प्रवेशे अंतरीं ।
मेनीं मनातें मोहरी ।
चित्तीं चैतन्यातें भरी ।
देहभावा उरी उरों नेदी ॥३॥
जीवाचें हरुनियां जीवपण ।
नेदी उरो मीतूंपण ।
वंदितांचि याचे चरण ।
करी बोळवण अहंकारा ॥४॥
निळा म्हणे भक्तपती ।
आला पुंडलिकाचिये आर्ती ।
अवघीं जाणतीं नेणतीं ।
केली सरतीं पायांपें ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निर्गुण निरामय संचले – संत निळोबाराय अभंग – ४५३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *