संत निळोबाराय अभंग

उभारिला ध्वज तिहीं – संत निळोबाराय अभंग – ४७२

उभारिला ध्वज तिहीं – संत निळोबाराय अभंग – ४७२


उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी ।
ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥
ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान ।
मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥
धरुनि सगुण रुपें केली क्रीडा ।
बोलविला रेडा निगम वावे ॥३॥
बैसूनियां वरी चालविली भिंती ।
चांगदेवा प्रती दिली भेटी ॥४॥
मग वास केला अळंकापुरासी ।
पिंपळ व्दारासी कनकाचा ॥५॥
निळा म्हणे ज्याच्या नामें करितां घोष ।
नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उभारिला ध्वज तिहीं – संत निळोबाराय अभंग – ४७२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *