संत निळोबाराय अभंग

अहो कृपेच्या सागरा – संत निळोबाराय अभंग – ४७३

अहो कृपेच्या सागरा – संत निळोबाराय अभंग – ४७३


अहो कृपेच्या सागरा ।
अहो भक्तकरुणाकरा ।
भक्तमुक्तीच्या दातारा ।
जगदोध्दारा विठोजी ॥१॥
अहो त्रिविक्रमा वामना ।
रामा कृष्णा मधुसुदना ।
दशरथत्मजा रघुनंदना ।
दानवदमना मुरारि ॥२॥
अहो चतुरामाजी सुजाणा ।
अहो अच्युता नारायणा ।
अहो राधारुक्मिणिरमणा ।
दिनोध्दारणा गोविंदा ॥३॥
अहोजी वैकुंठनायका ।
विश्वचराचरपालका ।
अनंतब्रम्हांडव्यापका ।
यदुकुळटिळका श्रीहरी ॥४॥
अहो केशवा माधवा ।
जनार्दना श्रीवासुदेवा ।
मुकुंदा दामोदरा यादव ।
भक्तजनभावा लक्षीत्या ॥५॥
अहो नृसिंहा श्रीधरा ।
मच्छ कूर्म वराह ऋषीकुमरा ।
अहो परात्परा अति सुंदरा ।
श्रीरमावरा गुणनिधी ॥६॥
अहो पदयनाभा शेषशयना ।
राजसा राजीवलोचना ।
निळा म्हणे सुखसंपन्ना ।
अहो निजनिधाना परामात्मया ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अहो कृपेच्या सागरा – संत निळोबाराय अभंग – ४७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *