संत निळोबाराय अभंग

आप आपणा नेणता – संत निळोबाराय अभंग – ४७८

आप आपणा नेणता – संत निळोबाराय अभंग – ४७८

आप आपणा नेणता ।
निर्मी बहमांडाच्या चळथा ॥१॥
काय सांगो नवल परी ।
ऐसी याची आकळ चोरी ॥२॥
अंगें आपण निराकार ।
प्रकटोनि दावी जगदाकार ॥३॥
निळा म्हणे महर्षि देवा ।
न कळती ऐशा याच्या मावा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आप आपणा नेणता – संत निळोबाराय अभंग – ४७८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *