संत निळोबाराय अभंग

कृपाळु भक्तांचा कैवारी – संत निळोबाराय अभंग – ४९३

कृपाळु भक्तांचा कैवारी – संत निळोबाराय अभंग – ४९३


कृपाळु भक्तांचा कैवारी ।
क्रोध दैत्यांदानवांवरी ।
एका तारी एका मारी ।
एका उध्दरी नाममात्रें ॥१॥
एका घरीं एका दारीं ।
एका ह्रदयीं एका परिवरी ।
एका धुंडितां अष्टही प्रहरीं ।
न सांपडे माझारी त्रैलोक्या ॥२॥
एकपत्नीव्रत दशरथा घरीं ।
रेणुकानंदन हा ब्रम्हचारी ।
मुंजिया बटु बळिच्या व्दारीं ।
महा व्यभिचारी नंदाचा ॥३॥
मोहनी रुपें सुंदोपसुंद ।
मोहुनी परस्परें करविला वध ।
वृंदेसी करुनियां शकट भेद ।
वधिला जालंदर रणरंगी ॥४॥
मत्स्यें केला शंखोव्दार ।
कुमें घेतला धराभार ।
वराहें हिराण्यक्ष असुर ।
मर्दुनी धरा धरिली निजदंती ॥५॥
नृसिंह हिरण्यकश्प विदारिला ।
वामनें बळी पाताळीं घातला ।
परशुरामानें सहस्त्रार्जुन वधिला ।
पृथ्वीचा केला दान धर्म ॥६॥
रामें रावणाचें मर्दन ।
केलें देवांचे बंदी मोचन ।
कृष्णें काळयवना जाळून ।
कंस चाणूर निवटिले ॥७॥
बौध्यें मोडविला दैत्ययज्ञ ।
वेदनिंदा निजमुखें करुन ।
कलंकिया म्लेंछचेनि निकंदन ।
पुढील कार्यार्थ हा असो ॥८॥
ऐसे अवतार घेउनी हरि ।
भूभार हरिले नानापरी ।
आपुलिया दासाचें रक्षण करी ।
संत चराचरीं गर्जती ॥९॥
चतुराननरुपें सृष्टीचें सृजन ।
विष्णुरुपें प्रतिपाळण ।
रुद्ररुपें परम क्षोभोन ।
करील संहार सकळांचा ॥१०॥
शंभु त्रिपुरातें संहारी ।
गजासुराचा मस्तक उतरी ।
गणेशरुपें नृत्यांच्या गजरीं ।
एका दैत्या चुरी पदघातें ॥११॥
ऐसीं हे चरित्रें श्रवण करितां ।
ठावो नुरेचि दोषा दुरिता ।
ब्रम्हानंदें श्रोता वक्ता ।
मुक्ति सायोज्यता पावती ॥१२॥
नानारुपें नाना नामें ।
नाना अवतार नाना कर्मे ।
धर्म रक्षिले ते सुखसंभ्रमें ।
निळा म्हणे सप्रेमें गर्जत ॥१३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृपाळु भक्तांचा कैवारी – संत निळोबाराय अभंग – ४९३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *