संत निळोबाराय अभंग

मग म्हणती अवघ्या जणी – संत निळोबाराय अभंग ५१

मग म्हणती अवघ्या जणी – संत निळोबाराय अभंग ५१


मग म्हणती अवघ्या जणी धांवोनि पहागे आणा पाणी ।
डास वरखडला न्याहाळुनी ।
रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥
पहाती तंव तो उत्तम अंगे ।
जेंवि का उठियलें अनंगे ।
नभापरी अलिप्त संगे ।
काय करिती अघात त्या ॥२॥
नानापरिंची अक्षवाणें ।
करी यशोदा वांदी दानें ।
यथाविधी व्दिजभोजनें ।
केलें जिताणें श्रीहरीचें ॥३॥
म्हणती नवीची रिठियाची माळा ।
घातली होती त्वां याचिया गळां ।
ते काय झाली गे याची वेळा ।
तेंचि अरिष्ट यासी होतें ॥४॥
ऐसा झाला घोषगजर ।
ऐकोनियां तो कंसासुर ।
म्हणे बोळविला महावीर ।
केला चकाचुर रिठाही ॥५॥
करितां उपाय न चले यासी ।
कंस भयाभीत मानसीं ।
म्हणे काळ हा जन्मला आम्हांसी ।
करील संहार काळाचा ॥६॥
निळा म्हणे न चले युक्ती ।
यापुढें कापटया समाप्ती ।
सर्वांतरवासी हा श्रीपती ।
कर्मफळदाता निजसत्तें ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मग म्हणती अवघ्या जणी – संत निळोबाराय अभंग ५१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *