संत निळोबाराय अभंग

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां – संत निळोबाराय अभंग ५२

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां – संत निळोबाराय अभंग ५२

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां ।
वधूनि येईल जो बाळका ।
त्यासी अर्ध राज्याची टीका ।
दूईन छत्र सिंहासन ॥१॥
मग तृणावर्त धेनुकासुर ।
मग केशिया शकटासुर ।
अघासुर सर्पविखार ।
चालिले भार दैत्यांचे ॥२॥
कृष्णें ते ते संहारिलें ।
नवल अदभुतचि वो केलें ।
निळा म्हणे आहे वर्णिलें ।
श्रीवेदव्यासें पुराणीं ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यावरी कंस म्हणे दैत्यादिकां – संत निळोबाराय अभंग ५२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *