येति जाति होति मरती – संत निळोबाराय अभंग – ५२४
येति जाति होति मरती ।
नानाकार भूतव्यक्ती ॥१॥
हा तो आहे जैसा तैसा ।
अनादि रुपें आपणाचि ऐसा ॥२॥
नहोनिया सूक्ष्मस्थूळ ।
वृध्द तरुणा अथवा बाळ ॥३॥
निळा म्हणे एकला येक ।
न होउनि एक ना अनेक ॥४॥
येति जाति होति मरती ।
नानाकार भूतव्यक्ती ॥१॥
हा तो आहे जैसा तैसा ।
अनादि रुपें आपणाचि ऐसा ॥२॥
नहोनिया सूक्ष्मस्थूळ ।
वृध्द तरुणा अथवा बाळ ॥३॥
निळा म्हणे एकला येक ।
न होउनि एक ना अनेक ॥४॥