संत निळोबाराय अभंग

अगा ये नरकासुरमर्दना – संत निळोबाराय अभंग – ५२५

अगा ये नरकासुरमर्दना – संत निळोबाराय अभंग – ५२५


अगा ये नरकासुरमर्दना ।
कुशदैत्यनिकंदना ।
अगा कंसमधुकैटभसूदना ।
अगा मर्दना हिरण्याक्षा ॥१॥
अगा वृत्रासुरनिहंत्या ।
हिरण्यकश्यपा विदारित्या ।
अगा रावण संहारित्या ।
कुंभकरणादीराक्षसां ॥२॥
अगा रिठासुराच्या वैया ।
सहस्त्रभुजांच्या वधणारा ।
अगा निवटीत्या भोमासुरा ।
सत्यभामावरा गोविंदा ॥३॥
अगा ये काळियादमना ।
शकटासुर विध्वंसना ।
अगा शिशुपाळवक्रदंतहनना ।
जरासंधभंजना कागबगा ॥४॥
अगा बळी बंधनाअसुरारी ।
अगाअरिमन्मथ तमारी ।
अगा ताटिकापूतनारी ।
गोवर्धनधारी बळिवंता ॥५॥
अगा ये केशियादमना ।
तृणासुरधेनुकहनना ।
अगा मरिचा सुबाहुउध्दरणा ।
त्रिशिराखरदूषणप्राणहर्त्या ॥६॥
अगा ये विरोचनजाळंधरअंतका ।
अहिरावणमहिरावणघातका ।
कबंधवाळीच्या हंतका ।
रघुकुलटिळका सांबहरणा ॥७॥
अगा ये शंखासुराचिरणारा ।
मच्छरुपिया पोहणारा ।
शुंभनिशुंभाचिया घातणारा ।
मोहनीरुप धरा दैत्यांतका ॥८॥
अगा ये अपारभक्तपाळका ।
पंढरीभुवैकुंठनायका ।
विश्व चराचरव्यापका ।
अभय वरदायका निळयाच्या ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अगा ये नरकासुरमर्दना – संत निळोबाराय अभंग – ५२५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *