महिमा अदभूतची पाहतां – संत निळोबाराय अभंग – ५२८
महिमा अदभूतची पाहतां ।
चरणीं उध्दार झाला पतिता ॥१॥
आहिल्या शिळा झाली शापें ।
चरणस्पशें ते निष्पाप ॥२॥
उध्दरिले विमळार्जून ।
अगाध चरणाचें महिमान ॥३॥
निळा म्हणे तारिल्या शिळा ।
हाही प्रताप आगळा ॥४॥