संत निळोबाराय अभंग

अगाध महिमा तुमचा – संत निळोबाराय अभंग – ५३८

अगाध महिमा तुमचा – संत निळोबाराय अभंग – ५३८

अगाध महिमा तुमचा देवा ।
काय म्यां वाणावा मूढमति ॥१॥
उगाचि म्हणवीं तुमचा दास ।
करुनियां आस पायांची ॥२॥
शब्दचातुर्य कांहींचि नेणें ।
बोबडें बोलणें घ्या कानीं ॥३॥
निळा म्हणे आपुला म्हणावा ।
भलतैसा ठेसा भलतेथें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अगाध महिमा तुमचा – संत निळोबाराय अभंग – ५३८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *