संत निळोबाराय अभंग

श्रुतीदेवाच्या कणिया खाणें – संत निळोबाराय अभंग – ५३७

श्रुतीदेवाच्या कणिया खाणें – संत निळोबाराय अभंग – ५३७

श्रुतीदेवाच्या कणिया खाणें ।
श्रलाध्य अन्नें विदुराच्या ॥१॥
द्रौपदीहातींचे भाजीपान ।
मानी समान पंचामृता ॥२॥
मुद्रला घरींचा वेचक पाक ।
मानी अधिक् क्षीराब्धीहुनी ॥३॥
निळा म्हणे नामयासवें ।
बैसोनि जेवावें परम प्रीति ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

श्रुतीदेवाच्या कणिया खाणें – संत निळोबाराय अभंग – ५३७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *