संत निळोबाराय अभंग

अवघ्यांचि दु:खाचा परिहार – संत निळोबाराय अभंग – ५४२

अवघ्यांचि दु:खाचा परिहार – संत निळोबाराय अभंग – ५४२


अवघ्यांचि दु:खाचा परिहार ।
चरणीं थार झालिया ॥१॥
आतां देवा नुपेक्षावें ।
आश्वासावें प्रीतीनें ॥२॥
बहुत श्रमित होऊनी आलों ।
वांयां धाडिलों न पाहिजे ॥३॥
निळा म्हणे कृपावंता ।
चरणीं आतां मज रक्षा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघ्यांचि दु:खाचा परिहार – संत निळोबाराय अभंग – ५४२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *