संत निळोबाराय अभंग

ऐसे देव आणि ऋषेश्वर – संत निळोबाराय अभंग ५६

ऐसे देव आणि ऋषेश्वर – संत निळोबाराय अभंग ५६


ऐसे देव आणि ऋषेश्वर ।
हर्ष होऊनियां निर्भर ।
नंदयशोदेचें वारंवार वर्णिती भाग्य निजमुर्खे ॥१॥
न संपडे जो योगसाधने ।
नाना तपें वेदाध्ययने ।
तो हा सगुणरुपें नारायण ।
क्रिडा करी याच्या घरीं ॥२॥
यावरी गौळणीही अति सुंदरा ।
कडिये घेउनी शारंगधरा ।
नेती उल्हासें निजमंदिरा ।
चुंबने देऊनि खेळविती ॥३॥
म्हणति कृष्णा रामा मेघ:शामा ।
योगी मुनिजन मनोरमा ।
सुलभ झालासी आजि तूं आम्हां ।
आवडी ऐसा वर्तसी ॥४॥
पूर्वाजिंतें उत्तमें होती ।
सकृतें त्यांचिया फळनिष्पत्ती ।
मोडोनी आलिया तुझीं हू मूर्ती ।
डोळेभरी अवलोकूं ॥५॥
ऐशिया उत्साहे त्या प्रमदा ।
नेती खेळविती गोविंदा ।
मग पावोनियां परमानंदा ।
शयनीं पर्यंकीं निजविती ॥६॥
निळा म्हणे सुख विश्रांति ।
पावल्या ऐशिया सत्संगती ।
पुढील कथा अपूर्व ख्याती बाळपणींचीं हरिकीर्ती ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसे देव आणि ऋषेश्वर – संत निळोबाराय अभंग ५६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *