संत निळोबाराय अभंग

कंसा मली भय संचारू – संत निळोबाराय अभंग ५७

कंसा मली भय संचारू – संत निळोबाराय अभंग ५७


कंसा मली भय संचारू ।
झाला तेणें चिंतातूर ।
बैसोनियां करी विचारू ।
कृष्ण्‍वधार्थ् प्रयोग ॥१॥
तें ऐकोनी उत्पात वार्ता ।
गोकुळींचिया लोकों समस्ता ।
धैर्य नुपजेचि म्हणती आर्ता ।
जावें पळोनी दूरदेशा ॥२॥
तंव नंद म्हणे ऐका मात ।
जावोनी वसो दरकुटी आत ।
साडुनिया जाता आपुला प्रांण ।
घरे दारे नुरतील ॥३॥
विचार मानला सकळांसी ।
गेली पळोनी दरकुटीयेसी ।
गांवी नाही मुंगी माशी ।
ऐसे ओस पडियले ॥४॥
उष्णा वारियांचे आघात ।
साउली न मिळेचि त्या वनांत ।
तंव देखिल्या अकस्मात ।
माईक गाडा श्‍कटासूर ॥५॥
यशोदा देखेनियां ते वेळी
बाळकृष्ण निजवी गाडियातळीं
तंव हा लाघवी वनमाळी ।
पद घातेंचि उडविला ॥६॥
तेणें तो आक्रंदला ।
घोष्‍ दणणिला ।
जाउनी मथुरेमाजि पडिला ।
कंस म्हणेरे शकटहि गाढा ।
आजि लाविला मृत्यूपंथे ॥८॥
निळा म्हणे गौळिये म्हणती ।
गाडा उडाला कैसिया रीती ।
तळीं होता हा श्रीपती ।
थेर भाग्यें वांचला ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कंसा मली भय संचारू – संत निळोबाराय अभंग ५७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *