संत निळोबाराय अभंग

माझी पूजा हेंचि – संत निळोबाराय अभंग – ५९२

माझी पूजा हेंचि – संत निळोबाराय अभंग – ५९२


माझी पूजा हेंचि अर्चन ।
तुमचें नामसंकीर्तन ।
नेणें करुं वेदाध्ययन ।
नेणें आसन योगाचें ॥१॥
म्हणोनि येतों काकुलती ।
अत्यंत मूढ आहे माझी मती ।
नेणें करुं तुमची स्तुती ।
अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥
कैसें होईल तें मी नेणें ।
भूत भविष्य वर्तमानें ।
अल्पबुध्दी माझें जिणें ।
मूढपणें वर्तणूक ॥३॥
यालागीं तुमचें धरिलें नाम ।
तुमचे स्तवनीं ठेविलें प्रेम ।
न कळे आणिक न चले नेम ।
साधन दुर्गम मज वाटे ॥४॥
नेणें तीर्था पलाटण ।
नेणें मंत्राचें पुरश्चरण ।
नेणें योगयाग सांख्यज्ञान ।
नेणें करुं ध्यान तुमची पूजा ॥५॥
नेणें कैसी माझी करुणा ।
येईल तुम्हां नारायणा ।
नेणें वर्णू तुमच्या गुणा ।
नेणें धारणा व्रतनिष्ठा ॥६॥
नाहीं वाचासंस्कार ।
नाहीं घोकिलें जी अक्षर ।
नेणें करुं यज्ञाचार ।
स्वधर्म तोहि विधियुक्त ॥७॥
निळा म्हणे सर्वांपरी ।
आहें मूर्ख मी श्रीहरी ।
ताराल ऐसिया नवल तरी ।
तुमची थोरी प्रगटेल ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझी पूजा हेंचि – संत निळोबाराय अभंग – ५९२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *