संत निळोबाराय अभंग

यावरी कोणे ऐके दिवशी – संत निळोबाराय अभंग ६०

यावरी कोणे ऐके दिवशी – संत निळोबाराय अभंग ६०


यावरी कोणे ऐके दिवशी ।
कृष्णें घेउनी सौंगडियांशी ।
आला यमुनेचे प्रदेशीं ।
तंव गाई खिल्लारें देखिलीं ॥१॥
तयामाजी अंति चोखडें ।
वत्स गाईचे ते पाडे ।
त्याचि ऐसें धरुनी रुपडें ।
वत्सासुर तेथ उभा ॥२॥
कृष्ण म्हणेरे हो गडिही ऐका ।
एक एक वत्स धरा नेटका ।
माही धरितों म्हणवेनि तंव कां ।
थांबला वत्सासुरावरी ॥३॥
तंव तो मायावी असुर ।
शिंगे पसरुनि पातला समोर ।
मागें करित लताप्रहार ।
आडवाचि उडे हाणवया ॥४॥
गौळी करीताती हाहाकार ।
मारिला नंदकुमर ।
अचपळ हा नव्हेचि स्थिर ।
कासया वत्स धरुं गेला ॥५॥
याचिये वदनीं निघती ज्वाळ ।
नासापुटींहुनी धूम्रकल्लोळ ।
बरें नव्हे हा पातला काळ ।
प्राण घ्यावया प्रगटला ॥६॥
निळा म्हणे धरिला कर्णी ।
मुरगाळूनि पाडिला धरणीं ।
मुष्टीघातेंचि चक्रपाणी ।
मोक्षपदातें पाठवी त्या ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यावरी कोणे ऐके दिवशी – संत निळोबाराय अभंग ६०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *