संत निळोबाराय अभंग

महा वैरी निर्दाळिला – संत निळोबाराय अभंग ६१

महा वैरी निर्दाळिला – संत निळोबाराय अभंग ६१


महा वैरी निर्दाळिला ।
पैल वत्सासुर निवटिला ।
म्हणती अचोज हा बळिया झाला ।
नंदरायाचा कुमरु ॥१॥
मात गेली कंसासुरा ।
ऐकोनि झाला तो घाबरा ।
विचारी आपुलिया कैवारा ।
न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥
जो तो जाउनी घातचि पावे ।
नये परतोनियां जीवें ।
यावरी आतां शरण जावें ।
कवणिया वीरा महीतळीं ॥३॥
तंव तो उठोनी अघासुर ।
करी रायासी जोहार ।
म्हणे न व्हावें चिंतातुर ।
विदया अपार मजपाशीं ॥४॥
राया तुझिया हितावरी ।
करीन गोकुळाची बोहरी ।
अवघेचि घालूनियां उदरीं ।
येईन कृष्णासमवेत ॥५॥
ऐसें तोषवूनियां राया ।
म्हणे गर्वारुढ ।
यावरी होऊनिया मूढ ।
काळासवें मांडूनियां होड ।
खेळों पाहे मश्यक ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

महा वैरी निर्दाळिला – संत निळोबाराय अभंग ६१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *