संत निळोबाराय अभंग

वाचा नामसंकीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – ६००

वाचा नामसंकीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – ६००


वाचा नामसंकीर्तनीं ।
मानस तुमच्या निश्चयें ध्यानी ।
नेत्र हे तुमच्या अवलोकनीं ।
चालावें चरणीं तीर्थयात्रे ॥१॥
करीं करावें तुमचें पूजन ।
श्रवणीं करावें गुणांचे श्रवण ।
चित्तें सदां तुमचें चिंतन ।
घ्राणी अवघ्राण निर्माल्य तुळसी ॥२॥
बुध्दीसी तुमची बोधकता ।
जीवीं तुमचीं राहो आस्था ।
तुमचे चरणीं निश्चळ माथा ।
अखंडता अखंड ॥३॥
सकळ इंद्रियां तुमची प्राप्ती ।
भगव्दावना राहो भूतीं ।
व्देषाव्देष तो नुमटो चित्तीं ।
दयावें श्रीपतीं हें दान ॥४॥
कांमक्रोधाचें न व्हावें दर्शन ।
नका आशेतृष्णेचें बंधन ।
ठेवा आपुल्या पायीं जीवन ।
दयावें समाधान सर्वदा मना ॥५॥
कीर्तन नित्यकाळ देवा तुझें ।
उतरीं मी हें माझें ओझें ।
आपुल्या गुणीं नाचवी भोजें ।
जिव्हा नामीं रंगों दया ॥६॥
निळा म्हणे कृपानिधी ।
माझी मोडावी व्दैतबुध्दि ।
अवघी तोडुनिया उपाधी ।
स्थापा निजपदीं शरणांगता ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाचा नामसंकीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – ६००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *