संत निळोबाराय अभंग

ऐसें वासुनी मुख अमूप – संत निळोबाराय अभंग ६३

ऐसें वासुनी मुख अमूप – संत निळोबाराय अभंग ६३


ऐसें वासुनी मुख अमूप ।
अघासुर पसरलासे सर्प ।
गाई गोवळे आपोआप ।
जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥
पुढे चालतां मार्ग न दिसे ।
अंध:कारी पडिलें ऐसें ।
मागे फिरावें तंव तो श्वासें ।
ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥
मग म्हणती येर येरासी ।
प्रात:काळींचि झाली निशी ।
गडदे पडिले न दिसे शशी ।
ग्रह तारांगणे ना भानु ॥३॥
पडिलों दरकुटिमाझारी ।
किंवा धुई दाटली भारी ।
अथवा मेहुडे आले वरी ।
कांवांहिंचि न दिसे न तर्क ॥४॥
जाभाडीं मेळविंता आघासुर
परि मागें राहिला सारंगधर ।
म्हणोनियां तो झाला स्थिर ।
तयाहि सगट गिळावया ॥५॥
तव दिवस घटिका चारी ।
आला चढोनियां वरी ।
गाई गोवळे भिन्न अंधारी ।
पडिलीं अघासुरा पोटीं ॥६॥
निळा म्हणें यावरी आतां ।
जागृत झालिया कृष्णनाथा ।
पुढें कैशी वर्तली कथा
ते परिसावी सात्विकीं ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसें वासुनी मुख अमूप – संत निळोबाराय अभंग ६३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *