संत निळोबाराय अभंग

कृष्ण बळराम उठिले – संत निळोबाराय अभंग ६४

कृष्ण बळराम उठिले – संत निळोबाराय अभंग ६४


कृष्ण बळराम उठिले ।
मुखमार्जनें सारिलें ।
तंव दसवंतिया बोले ।
जेउनी जावें गोधनापाठी ॥१॥
गाई गोवळ खोळंबले होते ।
पुढें गेले ते निरुते ।
मग आणूनियां भोजनातें ।
पुढें ठेविलीं रत्नताटें ॥२॥
उभयतां जेऊनियां उठिले ।
गोपशृंगार आणविले ।
विचित्र चोळणे कसिले ।
काचे वेष्टिले सुरंग ॥३॥
शिरीं मोरविसा टोप ।
कर्णीं कुंडला तेज अमूप ।
केशर चंदनाचे विलेप ।
टिळे लल्ल:टी रेखियेले ॥४॥
गुंजाहार घातले कंठी ।
खांदी कांबळी हाती वेताटी ।
मोहरी पावा गांजिवा
पावा गांजिवा पाठी ।
माजि दिव्यान्ने भरियेलीं ॥५॥
दंडी रुमाल करीं कंकणे ।
पायी वाहाणा शोभलें लेणें ।
ऐसे चालतां अतिसत्राणें ।
पुढे अघयातें ओळखिलें ॥६॥
एक जाभाडें गगनावरी ।
दुजें पृथ्वीची ऐसें निर्धारी ।
गाई गोपाळ गेले भीतरीं ।
निळा म्हणे हें जाणवलें ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृष्ण बळराम उठिले – संत निळोबाराय अभंग ६४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *