संत निळोबाराय अभंग

केव्हां भेटी देसी जिवाच्या – संत निळोबाराय अभंग – ६३१

केव्हां भेटी देसी जिवाच्या – संत निळोबाराय अभंग – ६३१


केव्हां भेटी देसी जिवाच्या जीवना ।
सुखाच्या निधाना पांडुरंगा ॥१॥
वोरसलें मन नित्य वाट पाहे ।
नयनीं नीज नये दिवसरात्रीं ॥२॥
आला जातो दिवस मास घटिका पळ ।
प्राण हा विव्हळ तुजलागीं ॥३॥
हुरहुरी चित्त सदा उत्कंठित ।
न पुरोचि हा हेत चितां वाटे ॥४॥
केव्हा येईल सार्थकाची वेळ ।
येसी कृपाळ धांवोनियां ॥५॥
निळा म्हणे आतां न लावावा उशीर ।
भेटोनी अंतर निववारें ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

केव्हां भेटी देसी जिवाच्या – संत निळोबाराय अभंग – ६३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *