कोठें विगुंतली – संत निळोबाराय अभंग – ६३२
कोठें विगुंतली ।
नेणों कोणें गोंवियेली ॥१॥
माझी न करीं आठवण ।
गेली बाळका विसरोन ॥२॥
न लावावा उशीर ।
नेणों कां झाली निष्ठुर ॥३॥
निळा म्हणे काय माझें ।
भार मानियलें ओझें ॥४॥
कोठें विगुंतली ।
नेणों कोणें गोंवियेली ॥१॥
माझी न करीं आठवण ।
गेली बाळका विसरोन ॥२॥
न लावावा उशीर ।
नेणों कां झाली निष्ठुर ॥३॥
निळा म्हणे काय माझें ।
भार मानियलें ओझें ॥४॥