संत निळोबाराय अभंग

एवढासा माझा भाव तो – संत निळोबाराय अभंग – ६५०

एवढासा माझा भाव तो – संत निळोबाराय अभंग – ६५०


एवढासा माझा भाव तो कायी ।
तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं ॥१॥
परी तुमचें अगाध देणें ।
जाणवलें यावरी उदारपणें ॥२॥
एवढिसी माझी मति ते किती ।
तेवढीचि वाढवुनि केली सरती ॥३॥
एवढेंसे तुम्हां गाइंलें जी देवा ।
तेवढेंचि स्वीकारुनी तोषलेति भावा ॥४॥
एवढीशी माझी वाचा ते किती ।
तेवढीचि आपुलिये लाविली स्तुति ॥५॥
एवढासा निळा एवढीसी भक्ती ।
अपारचि तुम्ही मानिली प्रीती ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एवढासा माझा भाव तो – संत निळोबाराय अभंग – ६५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *