संत निळोबाराय अभंग

कवण्या योगें तल्लिनता – संत निळोबाराय अभंग – ६५६

कवण्या योगें तल्लिनता – संत निळोबाराय अभंग – ६५६

कवण्या योगें तल्लिनता ।
ऐशी जडोनी ठेली चित्ता ॥१॥
हें मी नेणें गा श्रीपती ।
तुमची करणी तुम्हां हातीं ॥२॥
बुध्दि इंद्रियांचे कोड ।
पुरवुनी वाचा केली वाड ॥३॥
निळा म्हणे दिवसरतीं ।
कळे केव्हां जाती येती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कवण्या योगें तल्लिनता – संत निळोबाराय अभंग – ६५६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *