संत निळोबाराय अभंग

करीन कैवाड हाचि अनुदिनीं – संत निळोबाराय अभंग – ६५५

करीन कैवाड हाचि अनुदिनीं – संत निळोबाराय अभंग – ६५५

करीन कैवाड हाचि अनुदिनीं ।
तुमच्या चिंतनीं पांडुरंगा ॥१॥
नेदीं जाऊं वांयां घटिका एकी पळ ।
करुं सर्वकाळ हेचि चर्चा ॥२॥
संतसमागमें गाऊं नित्य नामें ।
आपुलिया प्रेमें आवडिच्या ॥३॥
आठवूं सुंदरु रुप मनोहर ।
कटावरी कर ठेविले ते ॥४॥
निळा म्हणे माझी मनींची आवडी ।
दाविली उघडी करुनियां ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

करीन कैवाड हाचि अनुदिनीं – संत निळोबाराय अभंग – ६५५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *