संत निळोबाराय अभंग

जाणों जातां तुम्हा जाणीवचि – संत निळोबाराय अभंग – ६६६

जाणों जातां तुम्हा जाणीवचि – संत निळोबाराय अभंग – ६६६


जाणों जातां तुम्हा जाणीवचि विरें ।
तुमच्या निजध्यासें मनचि मुरे ।
तुमचिये भेटीं अंगचि नुरे ।
वाचाहि वोसरे स्तवितां तुम्हां ॥१॥
ध्यानें तुमच्या जीवचि हारपे ।
तुम्हांसी जाणतां बुध्दीचि करपे ।
तुमच्या चिंतनें चित्तहि विसर्पें ।
मिसळें चिद्रुपें चैतन्येंसी ॥२॥
तुमच्या आठवें निळाची नाहीं ।
तुम्हीचि अवघे अंतर्बाहीं ।
तुम्हाविण दुसरें नुरेचि कांहीं ।
नाम रुप तेंहि आवघे तुम्ही ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जाणों जातां तुम्हा जाणीवचि – संत निळोबाराय अभंग – ६६६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *