संत निळोबाराय अभंग

यावरी म्हणे सवंगडियांसी – संत निळोबाराय अभंग ७१

यावरी म्हणे सवंगडियांसी – संत निळोबाराय अभंग ७१


यावरी म्हणे सवंगडियांसी ।
वत्सें फांकलीरे चौपासी ।
वळूनि आणा धांबा त्यासी ।
मग सावकाशी बैसा सुखें ॥१॥
तंव ते म्हणती हो वनमाळी ।
आजीचि वळती तुमची पाळी ।
जाऊनियां तूंचि सांभाळीं ।
आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥
तुंझिया शेषाची हे नवलाई ।
देहभाव आम्हां नुरेचि देहिं ।
जाणें येणें कैंचे काई ।
राहिलों ठायी निश्रचळपणें ॥३॥
देव म्हणे हे पावले खुणे ।
गडी माझो झाले शहाणे ।
समाधी सर्वहि ।
काय चतुराननें कीजे यांचे ॥४॥
यांचिये संगतीं वत्सें धालीं ।
ब्रम्हसुखातें पावलीं ।
वियोगवार्ता नेणती भुली ।
निजस्थिति राहिली स्वरुपींची ॥५॥
ऐसें जाणोनियां श्रीपती ।
म्हणे मी जातों आजिचे वळती ।
तुम्ही निश्रचळ रहा वृत्ती ।
कोणी सांगाती फांकों नका ॥६॥
निळा म्हणे सांगोनि ऐसें ।
मोहरी पावा घेतला हर्षे ।
वादन करितांचि पूर्व दिशे ।
वत्सेंहि सांडूनि चालिला ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यावरी म्हणे सवंगडियांसी – संत निळोबाराय अभंग ७१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *