संत निळोबाराय अभंग

दुरी फांकला हा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग ७२

दुरी फांकला हा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग ७२


दुरी फांकला हा श्रीहरी ।
ब्रम्हया जाणवलें अंतरी ।
मग धांवोनि झडकरी ।
वत्सें गोवळें उचलिली ॥१॥
ते तों होती समाधिस्थ ।
ब्रम्हा नेतो हे नेणतीची मात ।
मग ते नेऊनियां समस्त ।
सस्यलोकीं बैसविलर ॥२॥
यरवरी येऊनियां श्रीरंग ।
पाहे तंव न दिसे संग ।
भलें झालें म्हणतुसे मग ।
अवघे आपणचि हो सरला ॥३॥
ब्रम्हा आडवूं पाहे मज ।
तरी मी सांडीन त्याची पैज ।
ऐसें म्हणोनियां श्रीराज ।
वैष्णवी माया विस्तारिली ॥४॥
आपण वस्तें आपण गोवळ ।
मोह्या पावे घोंगडी सकळ ।
काठया पवे पाईतणें मेळ ।
झाला ते केवळ एकला एक ॥५॥
लुडे खुडे मुडके कान ।
गोरे सांवळे राजीवनयन ।
बोलिले तोतिरे म्लान वदन ।
दैदिप्यमान तोहि झाला ॥६॥
निळा म्हणे होतें तैसें ।
होऊनी ठेला तेवढेंचि जैसें ।
नव्हती पहिले कोणी ऐसें ।
ओळखेंचि नेणती अवलोकिंता ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दुरी फांकला हा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग ७२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *