संत निळोबाराय अभंग

प्रेम देऊनि सरतें केलें – संत निळोबाराय अभंग – ७१६

प्रेम देऊनि सरतें केलें – संत निळोबाराय अभंग – ७१६


प्रेम देऊनि सरतें केलें ।
आपुल्या नामें गौरविलें ।
माझिये वाचे श्रुंगारिले ।
गुणरत्नीं अमोघां ॥१॥
सर्वगुणीं गुणभरिता ।
सर्व रुपीं रुपमंडिता ।
सर्वकळा तूं कुशळता ।
साजती अनंता ब्रीदें चरणीं ॥२॥
सर्व गोमटा धरीत्या नामें ।
सर्व गोमटा करीत्या कर्मे ।
गोमटा जाणत्या वर्मे ।
सर्वी सर्व गोमटा तूं ॥३॥
मुख सुंदर अंगकांति ।
रुपसुंद मदनमूर्ति ।
यश सुंदर तुमची कीर्ती ।
अहो जगपती जगदानिया ॥४॥
निळा तुमचा शरणागत ।
तुमचे नामीं ठेविलें चित्त्‍ा ।
तुमच्या ब्रिदावळी पढत ।
करावा सनाथ म्हणउनी ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

प्रेम देऊनि सरतें केलें – संत निळोबाराय अभंग – ७१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *