संत निळोबाराय अभंग

गोवळी होते राखणाईंत – संत निळोबाराय अभंग ७५

गोवळी होते राखणाईंत – संत निळोबाराय अभंग ७५


गोवळी होते राखणाईंत ।
ते ते म्हणती झाला घात ।
गाई बुजल्या अकस्मात ।
पडणपात त्या झाला ॥१॥
मग ते आले पायवाटा ।
पाहाती गाई तंव सुभटा ।
वत्सें पान्हा घेती घटघटा ।
पूर लोटले क्षीराचिया सुकाळा ।
केले वत्सां आणि गोळियां ॥३॥
ऐसा झाला संध्याकाळ ।
तंव पातले गौळणींचे मेळ ।
सांजवाणी दुडिया घेऊनी सकळ ।
करित गायनें सुस्वरें ॥४॥
गौळी म्हणती पिंजल्या गाई द
गोंविद म्हणे दोहा त्याही ।
आजि दुधाची उणेंचि नाहीं ।
न पुरती पात्रें तैसिचि क्षीरें ॥५॥
गोवळ आपुलालिये घरी ।
रात्रीं वसती सुखशेजारीं ।
दिवसा जाती वनांतरी ।
वत्सापाठी हरिसंगें ॥६॥
निळा म्हणे चतुरानन ।
आला गोवत्सें घेऊन ।
म्हणे नेण्ता महिमान ।
चुकी झाली क्षमा कीजे ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गोवळी होते राखणाईंत – संत निळोबाराय अभंग ७५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *