संत निळोबाराय अभंग

तंव ते आधिले मागिले गोपाळ – संत निळोबाराय अभंग ७६

तंव ते आधिले मागिले गोपाळ – संत निळोबाराय अभंग ७६


तंव ते आधिले मागिले गोपाळ ।
सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ ।
हें देखोनियां विस्मित सकळ ।
म्हणती व्दिविध कैसेनि हे झालें ॥१॥
तैसेचि वत्सें दोनी दोनी ।
एकएक गाईलागुनी ।
सुखें पिऊं देती स्तनीं ।
आणि दुभती वोरसोनी यथेष्ट ॥२॥
तंव ते असमाई गोठी ।
होतीं अघासुराचे पोटीं ।
तेचि सांगती वडिला वोटीं
म्हणती नवल वितलें ॥३॥
आणि आम्हां अवघिया वनीं ।
घातलें होतें सर्पे वदनीं ।
मागें होता सारंगपाणी ।
तेणें तो चिरुनी टाकिला ॥४॥
मग वत्सें आणि गोवळ ।
आम्ही बाहेरी पडिलों सकळ ।
त्याचे पहाहो करवाळ ।
रक्तें पूर वाहती ॥५॥
नवल तें ऐकोनि कानीं ।
लोक चालिले पहावया नयनीं ।
तंव ते पडिले वाळोनी ।
गंगाओघा सारिखें ॥६॥
ये गोष्टीसी झालें वर्ष ।
गोवळांवाटे एकचि निमिष ।
निळा म्हणे सेविलें शेष ।
तेणें सर्वदा समाधी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तंव ते आधिले मागिले गोपाळ – संत निळोबाराय अभंग ७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *