वाम चरणीं वाहे – संत निळोबाराय अभंग – ८२०
वाम चरणीं वाहे नीर ।
गंगा अमृताचे पाझर ॥१॥
आवडे तें माझया मना ।
धणी न पुरेचि लोचना ॥२॥
महिमा जोडला मुद्रिका ।
ध्वज वज्र अंकुश उर्ध्वरेखा ॥३॥
निळा म्हणे मुंजुळ गाती ।
वाळे वांकी रुणझुणिती ॥४॥
वाम चरणीं वाहे नीर ।
गंगा अमृताचे पाझर ॥१॥
आवडे तें माझया मना ।
धणी न पुरेचि लोचना ॥२॥
महिमा जोडला मुद्रिका ।
ध्वज वज्र अंकुश उर्ध्वरेखा ॥३॥
निळा म्हणे मुंजुळ गाती ।
वाळे वांकी रुणझुणिती ॥४॥