संत निळोबाराय अभंग

वणिंतां चरित्रे न पुरे – संत निळोबाराय अभंग – ८१९

वणिंतां चरित्रे न पुरे – संत निळोबाराय अभंग – ८१९


वणिंतां चरित्रे न पुरे धणी ।
वाचा लांचावली हरीच्या गुणीं ।
स्वानंदाची उघडली खाणी ।
नामस्मरणीं मातली ॥१॥
अधिक् अधिक् स्फूर्तीचा प्रसर ।
आगळीं अक्षरें चालती फार ।
नेणों फुटलें हें चिदांबर ।
मेघवृष्टिन्यायें होतसें ॥२॥
आवरताही नावरे मती ।
लिहितां न पुरे हे दिवसरातीं ।
न कळें काय केलें संतीं ।
देउनी प्रसाद आपुला ॥३॥
अवघेंचि उघडूनियां भांडार ।
दृष्टी दाविलें सारासार ।
लेववूनियां ते अलंकार ।
केलें समोर बोलावया ॥४॥
अक्षरें वाचे येती ।
ते ते प्रमेयेसीचि उठती ।
नेणों गुंफोनी ठेविलीं होतीं ।
तेचि प्रसादीं वोपिलीं ॥५॥
नाहीं वाचेसी गुंतागोवा ।
तात्पर्यार्थाचि हा अघवा ।
ऐसा योजूनियां बरवा ।
मुहूर्त दिधला समर्थी ॥६॥
निळा आईत्या पिठावरी ।
रेघा आढीत बैसला घरीं ।
दैव मोडोनी आलें वरी ।
होतें संचितीं म्हणउनी ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वणिंतां चरित्रे न पुरे – संत निळोबाराय अभंग – ८१९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *