संत निळोबाराय अभंग

ब्रम्हानंदा भरणी आली – संत निळोबाराय अभंग – ८१८

ब्रम्हानंदा भरणी आली – संत निळोबाराय अभंग – ८१८

ब्रम्हानंदा भरणी आली ।
तेचि केली सामोरी ॥१॥
वंचिलें नाहीं कोणापाशीं ।
होतें मानसीं धरिलें तें ॥२॥
अवघे नाम विठोबाचें ।
स्वरुप त्याचें ध्यानीं मनीं ॥३॥
निळा म्हणे देतां हांके ।
उभाचि ठाकें सन्मुख ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ब्रम्हानंदा भरणी आली – संत निळोबाराय अभंग – ८१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *