मीचि माझा विस्मय करी – संत निळोबाराय अभंग – ८३७
मीचि माझा विस्मय करी ।
नवल परी देखोनी ॥१॥
कैशी येणें पांडुरंगें ।
अंगीं अंगें लपविलीं ॥२॥
पळही मात्र विसर देहीं ।
न पडेचि ठायीं व्यापियलें ॥३॥
निळा म्हणे नाम वाचे ।
गुण त्याचें आठवती ॥४॥
मीचि माझा विस्मय करी ।
नवल परी देखोनी ॥१॥
कैशी येणें पांडुरंगें ।
अंगीं अंगें लपविलीं ॥२॥
पळही मात्र विसर देहीं ।
न पडेचि ठायीं व्यापियलें ॥३॥
निळा म्हणे नाम वाचे ।
गुण त्याचें आठवती ॥४॥