याचा आश्रय झाला – संत निळोबाराय अभंग – ८३८
याचा आश्रय झाला आम्हां ।
या पुरुषोत्तमा विठठलाचा ॥१॥
गातां वाचितां चरित्रें याची ।
न करी दासांची उपेक्षा हा ॥२॥
आपुला संकेत सिध्दी न्यावा ।
करणें देवा हेंचि सत्य ॥३॥
निळा म्हणे निष्ठा जाणें ।
तैसाचि करणें आदर त्या ॥४॥