संत निळोबाराय अभंग

महासुखा पारणें होये – संत निळोबाराय अभंग – ८४४

महासुखा पारणें होये – संत निळोबाराय अभंग – ८४४

महासुखा पारणें होये ।
आनंद राहें लिगटोनी त्या ॥१॥
ऐशिया पावविलों विश्रांती ।
निमग्न वृत्ती इंद्रियांच्या ॥२॥
मनही तेथुनी वेगळेंचि नोहें ।
पांगुळले पाय प्राणाचे ॥३॥
निळा म्हणे रवि शशी ।
हारपले निशी दिवस दोन्ही ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

महासुखा पारणें होये – संत निळोबाराय अभंग – ८४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *