संत निळोबाराय अभंग

यावरी बगासुराची कथा – संत निळोबाराय अभंग ८७

यावरी बगासुराची कथा – संत निळोबाराय अभंग ८७


यावरी बगासुराची कथा ।
विचित्र आहे ते ऐकतां ।
कृष्णकरें पावोनि घाता ।
महामुक्तीतें वरील ॥१॥
मग तो बगरुपीया असुर ।
ध्यानस्थ यमुनातीरी स्थीर ।
झांकूनियां उभय नेत्र ।
एकाचि पायावरी उभा ॥२॥
कृष्ण घातावरी चित्त मनीं चिुंतूनिया तिष्ठत ।
म्हणे केव्हां देखेन तो येथ ।
येतां खेळत जवळी कैं ॥३॥
बाळलीलें येतांचि जवळी ।
गटकाळीन जेवीं मांसळी ।
हे जाणोनियां वनामाळी ।
आला खेळींमेळीं गडियांसवें ॥४॥
तंव तो पक्षिया देखिला कैसा ।
राजहेस कां सरोवरीचा जैसा ।
शोभयमान निश्रचळ ऐसा ।
लेंकरें म्हणती चला धरुं ॥५॥
कृष्ण म्हणे रे पक्षी क्रूर ।
नका जाऊं त्या समोर ।
मत्स्याही महा निष्ठूर ।
पापकर्मा दुरात्मा ॥६॥
तुम्ही राहा एकीकडे ।
मागेंचि लपोनियां गडे ।
जाऊनि मी पाहतों पुढें ।
उघडितो नेत्र कीं नाही ॥७॥
पहा लपत लपतचि जातों ।
आणी देईल धरुं तरी आणितों ।
परी तुम्ही करा जें सांगतों ।
दुरीचि असा पैलाडी ॥८॥
तंव पालवथाचे अवघक लोक ।
पाहाती कृष्णाचें कौतुक ।
म्हणत नंदाचा हा बाळक ।
पहारे कैसा पिलंगतो ॥९॥
निळा म्हणे जैसा चित्ता हरणी देखोनियां तत्वता ।
सुरके भूमिची आतौता ।
तैसाचि हाही वेग करी ॥१०॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

यावरी बगासुराची कथा – संत निळोबाराय अभंग ८७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *