संत निळोबाराय अभंग

त्याचिपरि हा मुरारी – संत निळोबाराय अभंग ८८

त्याचिपरि हा मुरारी – संत निळोबाराय अभंग ८८


त्याचिपरि हा मुरारी ।
पसरला न दिसेचि ऐसा दुरी  ।
चालतू उदगाचिया परी ।
तो असुरी लक्षित ॥१॥
येतां देखोनियां कृष्णासी ।
दैत्य हारीखला मानसीं ।
म्हणे साधूनियां निजकार्यांसी ।
जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥२॥
ऐसें विचारुनियां मानसीं ।
पक्ष झाडी अति अवेशीं ।
म्हणे कंसाचिया पुण्यराशी ।
झालिया सन्मुख या काळें ॥३॥
आतां गिळुनियां नंदकुमारा ।
खोवीन मस्तकी यशाचा तुरा ।
मात जाणवीन रोश्रवरा ।
मथुरेशर जाऊनि उल्हासें ॥४॥
म्हणोनी आतां राहें सुखी ।
माझिया बळें तूं इहलोकीं ।
तोषवीन नृपति पुण्यलोकीं ।
आम्हां पाळक दैत्याचा ॥५॥
परी हा मृत्यूचि आला हें नेणतु ।
वृथाचि मनोरथ वाढवितु ।
आपआपणासीची श्रलाघवितु ।
महा मूर्ख तो पापराशी ॥६॥
मग अति आवेशें धांविला ।
कृष्णा झगटावया पातला ।
तंव तो तेणें आसूडिला ।
तोंडघशीं पडिला चरणातळीं ॥७॥
पक्ष धरुनियां  दोन्ही हातें ।
उपटूनियां सांडिले परौतें ।
लोला करुनियां गोपीनाथें ।
चरणघातें तुडविला ॥८॥
ऐशियापरी घाबरा केला ।
चुंचीत धरुनियां घोळसिला ।
म्हणे मायाविया दाखवीं आला ।
मायाप्रतापु या काळें ॥९॥
बहुत दिवस मामाचें अन्न्‍ा ।
भक्षिलें झाडा तो घेईन ।
आजि मृत्युपंथे पाठवीन ।
गौरव करुन ताडनाचा ॥१०॥
ऐसें बोलोनियां श्रीहरि ।
सोडिला तंव तो दीर्घ स्वरीं ।
गर्जोनियां कृष्णावरी ।
अति तवकें उठिला ॥११॥
आधींच तंव तो निशाचर ।
रुप धरुनियां भयंकर ।
कृष्णा गिळावया सत्वर ।
मुख पसरुनी धंविला ॥१२॥
हें देखोलि लोक म्हणती ।
गिळिला गिळिला रे श्रीपती ।
वेगीं जाऊनियां नंदाप्रती ।
मात जाणवा दसवंतिये ॥१३॥
ऐसा झाला हाहाकार ।
कृष्णें तेचि क्षणीं अति सत्वर ।
‍िफोडूनि जाभाडें दंतावळि चुर ।
करुनियां पाडिला ॥१४॥
मग रगडूनियां पादघातें ।
मुरगाळिली मुंडी होतें ।
दैत्य त्यागिता निज देहातें ।
शब्द केला आचाट ॥१५॥
म्हणे धांव धांव कंसासुरा ।
तुझिये काजीं वेंचलों पुरा ।
निळा म्हणे मग शारंगधरा ।
वरुनी प्राणा ओंवाळिलें ॥१६॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

त्याचिपरि हा मुरारी – संत निळोबाराय अभंग ८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *