संती ठेविलें निश्चळ ठायीं – संत निळोबाराय अभंग – ८७२
संती ठेविलें निश्चळ ठायीं ।
चित्त हें पायीं आपुलीये ॥१॥
तेणें समाधन वृत्ती ।
नव्हेचि स्थिति पालट ॥२॥
अखंडिता राहिले ध्यान ।
होउनी उन्मन मनाचें ॥३॥
निळा म्हणे कृपा केली ।
जाणों आली या अर्थ ॥४॥