संत निळोबाराय अभंग

उत्तम अधम जया – संत निळोबाराय अभंग – ९४६

उत्तम अधम जया – संत निळोबाराय अभंग – ९४६


उत्तम अधम जया जे संगती ।
तैसी त्याचि मति फांकों लागें ॥१॥
सज्जना संगतीं धर्मक्रिया वाढे ।
पापीया आवडे पापबुध्दि ॥२॥
म्हणोनि जैसिया तैसा झाला हरी ।
भक्ता मित्र वैरी निंदक खळा ॥३॥
निळा म्हणे जाणे अंतरीचां भाव ।
तया तैसा देव फळदाता ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उत्तम अधम जया – संत निळोबाराय अभंग – ९४६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *