संत निळोबाराय अभंग

हात पाय इंद्रियें मिळोनि – संत निळोबाराय अभंग – ९७९

हात पाय इंद्रियें मिळोनि – संत निळोबाराय अभंग – ९७९

हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा ।
चला म्हणती पाहों डोळा ॥१॥
देखणेंचि नव्हती देखती काये ।
अवघीयाचा देखणा डोळाचि आहे ॥२॥
आंता डोळिया डोळा पाहों म्हणे ।
तंव आपआपणीया न चले पाहाणें ॥३॥
निळा म्हणे ऐशिया परी ।
जाणों जातां जाणणेंचि हरि ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हात पाय इंद्रियें मिळोनि – संत निळोबाराय अभंग – ९७९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *